Breaking News | भारत-पाकिस्तान युद्धविरामावर सहमती; ट्रम्प यांची मध्यस्ती

लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा यशस्वी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नवी दिल्ली | १० मे | प्रतिनिधी

(Breaking News) भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेले काही आठवडे सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य वातावरणात आज मोठी आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुपारी सोशल मीडियावरून दावा केला की, भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.

(Breaking News)  भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले, तरी आज दुपारी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी—भारताचे आणि पाकिस्तानचे डीजीएमओ (Director General of Military Operations)—यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दुपारी ३.३५ वाजता भारताच्या डीजीएमओंना फोन केला. या चर्चेत संध्याकाळी ५ वाजल्यापासून सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जमिनीवरील गोळीबार, हवाई आणि समुद्री कारवायाही थांबवण्यात येणार असल्याचे ठरले आहे.

(Breaking News)  भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, पुढील चर्चा १२ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याचेही जाहीर केले.

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे आणि ते युद्धविरामाच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.

(Breaking News)  जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर भारताने नियंत्रण रेषेच्या पलीकडील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती, तर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते.

आज झालेल्या लष्करी चर्चेने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हालचालींमुळे युद्धाचे सावट दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, अंतिम घोषणा आणि अंमलबजावणीसाठी भारत सरकारच्या अधिकृत प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे हि वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *