अहमदनगर | ३०.९ | रयत समाचार
(Politics) नुकत्याच झालेल्या पावसामुळे सीना नदीपात्रातील अतिक्रमणांचा गंभीर धोका पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या काही राजकीय व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आ. संग्राम जगताप यांनी ठपका ठेवत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन दिले.
(Politics) निवेदनात सांगण्यात आले, हा विषय यापूर्वीही विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात आला होता. त्यानंतर नदीची हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, काहींनी न्यायालयाची दिशाभूल करून स्थगिती मिळवली. आजच्या पूरस्थितीत या अतिक्रमणांचे खरे स्वरूप उघड झाले असून, यावर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सत्य परिस्थिती मांडावी व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
(Politics) जर या दुर्घटनेत जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण राहिले असते? मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी संपूर्ण शहराचा जीव धोक्यात घालता येणार नाही. प्रशासनाने कुठलाही दबाव न बाळगता कठोर कारवाई केली पाहिजे, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया राजकीय दडपणाला बळी न पडता आता काय निर्णय घेते याकडे हिंदुत्ववादी शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


