Education | गोवा इंटरस्कूल सायन्स फेअर 2026; विद्यार्थ्यांतील ‘न्यूटन-आइन्स्टाईन’ शोधण्याचा बीआयईचा संकल्प

संशोधनाधारित प्रकल्पांसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पणजी | १७.११ | रयत समाचार

(Education) Board of Innovative Education (BIE) व AJ Academy for Research and Development यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यातील पहिल्यावहिल्या संशोधनाधारित इंटरस्कूल सायन्स फेअर २०२६ साठी शिक्षकांचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होणारा हा उपक्रम पारंपरिक मॉडेल-मेकींगच्या चौकटीबाहेर जाऊन खऱ्या वैज्ञानिक चौकसपणाला चालना देण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे.Education

(Education) या प्रशिक्षणात शिक्षकांना प्राथमिक पातळीपासून शैक्षणिक संकल्पना आणि वैज्ञानिक संशोधनाची सांगड कशी घालावी, विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, प्रश्ननिर्मिती, प्रयोग, निरीक्षण आणि पुराव्याधारित निष्कर्ष मांडण्याची क्षमता कशी विकसित करावी याबाबत मार्गदर्शन केले गेले. संशोधन प्रश्न ठरवणे, अनुमान मांडणे, चल-घटक ओळखणे, प्रयोगांची मांडणी, संकलित आकडेवारीचे विश्लेषण आणि निष्कर्ष सादर करणे या वैज्ञानिक पद्धतीचे सर्व टप्पे शिक्षकांना प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकवण्यात आले.

(Education) यावर्षीच्या सायन्स फेअरची विशेषता म्हणजे गोवा विशिष्ट संशोधन विषयांवर दिला जाणारा भर. यात किनारपट्टी क्षरण, मॅनग्रोव्ह परिसंस्था, पाण्याची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, पर्यटन व खाण व्यवसायाचा पर्यावरणावर होणारा परिणाम तसेच स्थानिक जैवविविधतेसमोरील आव्हाने अशा विषयांचा समावेश असून विद्यार्थी त्यांच्या सभोवतालच्या प्रत्यक्ष समस्यांवर उपायावर आधारित विज्ञान प्रकल्प तयार करणार आहेत.
कार्यक्रमात बोलताना BIEचे सचिव म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त सी.व्ही. रामन, आइन्स्टाईन आणि न्यूटन शोधणे हा सायन्स फेअरचा मुख्य हेतू आहे. गोव्यात संशोधन संस्कृतीची मजबूत पायाभरणी करणे हीच वेळेची गरज आहे. शिक्षक हे या उपक्रमाचे मुख्य बळ असून त्यांना योग्य मार्गदर्शन साधने, सूत्रे व मेंटरिंग तंत्रे यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
गोवा इंटरस्कूल सायन्स फेअर २०२६ मध्ये विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष समस्यांवर आधारित संशोधनात्मक प्रकल्पांची अपेक्षा असून हा उपक्रम तरुण पिढीला विज्ञानाकडे समस्या निवारणाच्या गतिशील साधनाप्रमाणे पाहण्याची प्रेरणा देणार आहे.
TAGGED:
Share This Article