asia cup: १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये पाकिस्तानची विजयाने सुरुवात, भारताचा ४३ धावांनी केला पराभव

70 / 100 SEO Score

वैभव सूर्यवंशी केवळ १ धावात बाद !

मुंबई | ३० नोव्हेंबर | गुरुदत्त वाकदेकर

asia cup युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्पर्धेतील प्रबळ दावेदार भारताचा ४३ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ विकेट गमावत २८१ धावा केल्या. शाहजेब खानने सर्वाधिक १५९ धावा केल्या.

asia cup प्रत्युत्तरात भारतीय क्रिकेट संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४७.१ षटकांत २३८ धावांवर सर्वबाद झाला. निखिल कुमारने ६७ धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक ३ बळी घेतले तर फहम आणि सुभान यांना प्रत्येकी २ यश मिळाले.

शाहजेबने आपल्या खेळीत १० षटकार आणि ५ चौकार लगावले. शाहजेब आणि सलामीवीर उस्मान खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी झाली. उस्मान ९४ चेंडूत ६० धावांची खेळी खेळून बाद झाला. पण, शाहजेब शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. त्याने मनमोकळेपणाने फलंदाजी करत १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शाहजेबने युवा एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा कामरान गुलाम (७) यांचा विक्रम मोडला, त्याने १० षटकार मारले.
एकवेळ पाकिस्तानची धावसंख्या ४३.३ षटकांत ३ बाद २४१ धावा होती. असे असतानाही पाकिस्तान संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ५ षटकांत कसून गोलंदाजी करत पाकिस्तानला २८१ धावांवर रोखले. भारताकडून समर्थ नागराजने ३ आणि आयुष म्हात्रेने २ बळी घेतले. पाकिस्तानने शेवटच्या ५ षटकात ४ गडी गमावून ३३ धावा केल्या.
१३ वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील भारतासाठी या सामन्यात खेळत होता, त्याला केवळ १ धाव करता आली. ज्याला अलीकडेच आयपीएल २०२५ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले होते.

हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *