अहमदनगर | २४ जून | प्रतिनिधी
(Art) येथील चित्रकार नुरील प्रभात भोसले यांना सहावे ऑल इंडिया कला स्पर्धा प्रदर्शनात तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. युवा विकास पर्यटन व संस्कृती विभाग तेलंगणा सरकारच्या वतीने या कला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
(Art) हैदराबाद येथील स्टेट गॅलरी ऑफ आर्ट येथे कला स्पर्धा प्रदर्शन पार पडले. यामध्ये भारतभरातून एकूण २ हजार कलाकारांच्या कलाकृतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १५० कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्या. त्यातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राहुरी तालुक्यातील चित्रकार नुरील भोसले यांच्या अरुंधती या व्यक्तीची चित्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
हे चित्र कागदावरती जलरंग या माध्यमातून रंगविले असून, त्याचा आकार २४ बाय ३२ इंच आहे.


