Art | ‘निळू फुले करंडक’ स्पर्धेचा पोस्टर प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

पुणे | २२ जुलै | प्रतिनिधी

(Art) राष्ट्र सेवा दल आयोजित ‘निळू फुले करंडक खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (पर्व २)’ या विशेष स्पर्धेचा पोस्टर प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यात राष्ट्र सेवा दल कार्यालय, सानेगुरुजी स्मारक येथे उत्साहात पार पडला.

(Art) उद्घाटन सोहळ्याला राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजा कांदळकर, विश्वस्त अतुल देशमुख, राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाकीर अत्तार, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता कदम, कुणाल शहा, महादेव हेरवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

(Art) सेवा दल अभ्यासिका समन्वयक निलेश निंबाळकर, छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले, अ‍ॅड. संपत कांबळे, शरद कोकाटे, राकेश नेवासकर, प्रा. भगवान कोकणे, सौरभ शिंपी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
सामाजिक भान असलेले ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या स्मरणार्थ हा करंडक दिला जात असून, कला, लोकशाही मूल्य, सामाजिक शिक्षण व नवोदित कलाकारांना मंच मिळवून देण्याचा उद्देश या स्पर्धेमागे आहे.
स्पर्धेच्या तारखा  २९, ३० सप्टेंबर व १, २ ऑक्टोबर २०२५. स्थळ व प्रवेश माहिती लवकरच जाहीर होणार. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख महादेव हेरवाडकर 9923191613, नियोजक प्रमुख कुणाल शहा 8408989270 यांना संपर्क साधण्याचे कळविले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *