महादजी शिंदे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
श्रीगोंदा | प्रतिनिधी| २३ डिसेंबर
Ahilyanagar News रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘धिना धिन धा‘ या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना लय-ताल-सूरांची संगीतमय आदरांजली समर्पित करण्यात आली.
कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेक्षकांच्या जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बोलताना रयत शिक्षण संस्था देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. महादजी शिंदे विद्यालयामध्ये विद्यार्थी केवळ बौद्धिकच नव्हे तर शारीरिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक विकासाकडे लक्ष दिले जाते. आणि त्यामुळेच विद्यार्थी सर्वगुणसंपन्न आणि सक्षम नागरिक बनतो असे प्रतिपादन केले.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर नृत्य, शेतकरी आत्महत्या नाटक, भावगीत, भक्तीगीत गायन, हार्मोनियम, पियनो, तबला वादन, अशा वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमांनी रंगत आणली आणि प्रेक्षकांच्या नजरेचे पारणे फेडले.
यावेळी थोर देणगीदार प्रशांत दरेकर, प्रशांत गोरे, ज्ञानेश्वर खेतमाळीस, नवनाथ दरेकर विनोद होले, या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर बाळासाहेब महाडिक, रवीशेठ दंडनाईक, अजय गाडेकर ,मिलींद दरेकर, बापूशेठ गोरे, सतिष दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष शिंदे, लक्ष्मीकांत खेडकर, अंकुश हिंगणे, राजेश पोटे, विलास लबडे, सर्व सेवकवृंद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप भुजबळ, सूत्रसंचालन सचिन झगडे, माधुरी सरोदे , मंजुश्री चोथे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे यांनी केले.
हे ही वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी