शेवगाव |२५ डिसेंबर |लक्ष्मण मडके
Ahilyanagar News शेवगाव शहरातील हजरत सय्यद सोनेमियाँ वाली साहेब यांच्या यात्रोत्सवानिमित्त हजारो हिंदु मुस्लीम भाविक भक्तांनी मनोभावे फुले फुलांची चादरी दर्ग्यास अर्पण करुन दर्शन घेतले.रविवारी व सोमवारी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. अनेक भाविकांनी आपल्या नवसाची पुर्ती केली. ही यात्रा हिंदु-मुस्लीम बांधवांच्या ऐक्याचे प्रतिक ठरलेली आहे. यात्रेनिमित्त शनिवारी रात्री वादयांच्या गजरात संदलची मिरवणुक निघाली. शहरातील विविध मंडळांनी रविवार, सोमवार असे दोन दिवस फुलांच्या चादरी अर्पण केल्या. तसेच शहरातील विविध संघटना, मंडळे यांनी वाजत गाजत फुलांच्या चादरींची मिरवणुक काढुन त्या दर्ग्यावर अर्पण केल्या.
या यात्रेत विविध मिठाई व खेळणीची दुकाने थाटली होती, लहानांच्या करमणुकीसाठी विविध रहाट पाळणे हाऊस फुल झालेले दिसत होते. देवस्थानच्या वतीने य व्यवस्थीतरित्या नियोजन केले पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशोक काटे , गुप्तचर विभागाचे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी