Ahilyanagar News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ; संपुर्णा सावंत - Rayat Samachar

Ahilyanagar News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ; संपुर्णा सावंत

रयत समाचार वृत्तसेवा
63 / 100

अहमदनगर | २२ डिसेंबर | आबीद खान

Ahilyanagar News मस्साजोग केज बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कडून जाहीर निषेध करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष शोभा भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेखाताई कडूस, सचिव वंदना नीगुट,शिलाताई शिंदे,अंमल सासे, सुरेखा सांगळे, स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी आदी उपस्थित होते. सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल.असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदारां मार्फत निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी

- येथे आपली जाहीरात प्रसिद्ध करू शकता -
Ad image
Share This Article
Leave a comment