अहमदनगर | २८ नोव्हेंबर | भैरवनाथ वाकळे
Ahmednagar News येथील मानव अधिकार अभियान, सी.एस.आर.डी. समाजकार्य व संशोधन संस्था, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व समविचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, ता.२६ नोव्हेंबर रोजी संविधान जागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे सातवे वर्ष. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अशोक सब्बन यांनी पुढाकार घेऊन सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
संविधान अभ्यासक सुभाष वारे, अशोक सब्बन, आर्कि.अर्शद शेख व समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांच्या जयजयकारासह “संविधान चिरायू होवो” च्या घोषणा देण्यात आल्या. सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात झाली. Ahmednagar News
यावेळी समाजकार्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या एमएसडब्ल्यू प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ‘संविधान सर्वांसाठी’ या संकल्पनेवर आधारीत विविध सामाजिक व चळवळीची गीते तसेच घोषणा यांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जागर केला. यामधे अश्विनी भोसले, शुभम गायकवाड, जितेश कांबळे, धिरज वरघट, मनोज सावडेकर, आयुष शेटे, अभिषेक ब्राम्हणे, रोहन काळे, गौरव गाडेकर, विशाल शिरसाठ आदींनी प्रबोधन गीते म्हटली. Ahmednagar News त्यांना ‘माणुसकीची शाळा’चे शिवाजी नायकवाडी आणि बीजेएमसी प्रथम वर्षाचे भैरवनाथ वाकळे यांनी संगीत वाद्यासाठी साथसंगत दिली.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर