आळंदी | प्रतिनिधी
Cultural रिंगण वक्तृत्व स्पर्धा आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदसोहळा आहे. महाराष्ट्रभरातली अभ्यास, विचार करणारी मुलीमुले संतांवर तगडे बोलतात. ते ऐकताना दिवसभर कितीदातरी अंगावर रोमांच उभे राहतात. डोळे ओले होतात. त्यासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी आळंदीला जाण्याची आम्ही वर्षभर वाट बघत असतो, असे रिंगणचे संपादक सचिन परब यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, संतविचारांवर आधारित पहिली आणि एकमेव वक्तृत्व स्पर्धा असे आम्ही सगळे ज्याचे अभिमानाने वर्णन करतो त्या स्पर्धेचे हे चौथं वर्षं. पांडुरंग हा सत्य संकल्पाचा दाता आहे, याचा अनुभव या स्पर्धेने नेहमी दिला. अशी स्पर्धा घेण्याचा विचार करावा आणि परिवर्तन युवा वक्तृत्व स्पर्धेचे स्वामीराज भिसे, प्रवीण शिंदे, पांडुरंग कंद सर आणि इतर मित्र भेटणं असो किंवा श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे विशालभाऊ तांबे यांचं स्पर्धेशी जोडलं जाणं असो, मागे वळून बघताना सुखद योगायोग वाटतात.
अधिक माहिती देतान त्यांनी सांगितले, रविवारी ता.१५ डिसेंबर २०२४ रोजी आळंदीत ही स्पर्धा होतेय. सोबत पोस्टर जोडलेय, त्यात विषय, बक्षिसे, नोंदणीसाठी नंबर, नियम सगळं दिलेय. १५ ते ३० अशा वयोगटासाठी स्पर्धा आहे. नोंदणी आधीच जोरात सुरू झाली आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोस्टर पोचवावे, असे आवाहन रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी केले. सोबत संपर्कासाठी ९९८७०३६८०५, ९४२०६८५१८३ क्रमांक दिले आहेत.