पाथर्डी | १८ ऑक्टोबर | राजेंद्र देवढे
Education समाजातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या लोकांनी दुर्बल घटकातील लोकांना सहकार्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, तरच रामरावबापूंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल, असे मत सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मोहन जाधव यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने, बंजारा समाजाचे धर्मगुरू परमपूज्य राष्ट्रसंत डॉ. रामरावबापू यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बंजारा समाजाचे नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, मेजर देवीचंद पवार, माजी मुख्याध्यापक भागवत राठोड, उद्योजक दत्तूशेठ चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बबन पवार, चंद्रकांत चव्हाण, सुधाकर पवार, विनायक राठोड, कुंडलिक वडते आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना जाधव म्हणाले, आई वडिलांनी काबाडकष्ट आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या घोर मेहनतीला हे फळ आले. आजच्या युगात व भविष्यातही शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे जाधव म्हणाले.
यावेळी विलास पवार, नवनाथ राठोड, दत्तू पवार, ज्ञानदेव राठोड, एकनाथ राठोड, पवन राठोड यांच्यासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवाजी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, निसर्गकवी सचिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर नितीन जाधव यांनी आभार मानले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा