Social: पथनाट्य समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम - प्रा. जगदीश संसारे; एनएसएसचे शिबीर संपन्न - Rayat Samachar

Social: पथनाट्य समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम – प्रा. जगदीश संसारे; एनएसएसचे शिबीर संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
70 / 100

मुंबई | ३१ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर

कीर्ती महाविद्यालय येथे गुरुवारी ता. २९ ऑगस्ट रोजी Social राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एनएसएसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्य प्रशिक्षण शिबीरात बोलताना मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक जगदीश संसारे म्हणाले, पथनाट्य हे प्रामुख्याने समाजप्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पथनाट्यातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडता येते. पथनाट्य करणारे कलाकार समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतात आणि माणूस म्हणून जगतात.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोग यांनी गणेशोत्सवामध्ये १५१ भागात पथनाट्य सादर करण्याचा मानस व्यक्त केला. महाविद्यालयाचे एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी आणि मुंबई विद्यापीठातील क्षेत्रीय समन्वयक प्रा.अंकुश दळवी प्रशिक्षणाविषयी बोलताना म्हणाले, अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे पथनाट्य अधिक दर्जेदार होईल विद्यार्थ्यांना पथनाट्याचा सर्वांगीण अभ्यास करता येईल.

महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रतिभा बिस्वास म्हणाल्या, पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी संवेदनशील असतात. ते स्वतः जागरूक नागरिक असतात. त्यावेळी एनएसएसच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. पूजा कांबळे आवर्जून उपस्थित होत्या.

जवळपास ५० स्वयंसेवकांनी या पथनाट्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी ओमकार वाक्कर या स्वयंसेवकाने अथक परिश्रम घेतले. त्याला साहिल, नम्रता, साई, सोहम यांची साथ लाभली.

जूनियर महाविद्यालयातील स्वयंसेविका वेनिला कदम हिने सूत्रसंचालन केले. सलोनी भोसले हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. तर अथर्व फाळके यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

VIRAJ TRAVELS
Ad image

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ

Share This Article
Leave a comment