Politics: आ.पवार, खा.लंके, निंबाळकर यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या लोकार्पणासह दोन हजार सायकलींचे वाटप - Rayat Samachar
Ad image

politics: आ.पवार, खा.लंके, निंबाळकर यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या लोकार्पणासह दोन हजार सायकलींचे वाटप

69 / 100

जामखेड | १९ ऑगस्ट | रिजवान शेख, जवळा

तालुक्यात कर्जत जामखेडचे politics  आ.रोहित पवार अहमदनगर दक्षिणचे खा.निलेश लंके तसेच धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत जामखेडमधील विविध विकासकामांचे लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सामाजिक सभागृह १.५० कोटी, सार्वजनिक वाचनालय १.२० कोटी, नानानानी पार्क २ कोटी, वैकुंठभूमी २ कोटी, नगरपरिषद इमारत ५ कोटी, पंचायत समिती जामखेड ३.८८ कोटी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना दोन हजार सायकलींचे वाटप करण्यात आले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यावेळी खा. लंके यांनी सांगितले, मला पाच वर्षाकारीता जनतेने लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. मी कसलाही भेदभाव बाळगणार नाही. खा.ओमराजेंनी सरकारवर निशाणा साधत म्हणले आ.रोहित पवार यांच्यावर ईडीच्या धाडी टाकल्या त्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला परंतु ते झुकले नाहीत. रोहित पवार खरे शूरवीर ठरले. जनतेला हे सगळं माहीत आहे. जनता याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

यावेळी प्रतापकाका ढाकणे, विजयसिंह गोलेकर, माजी जी.प.सदस्य दत्ता वारे, माजी सभापती सूर्यकांत मोरे, मार्केटकमिटी संचालक सुधीर राळेभात, जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात, उमर कुरेशी, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, शे.का.प.चे मंगेश आजबे, संजय वराट, विश्वनाथ राऊत, बापूराव ढवळे, गणेश चव्हाण, शहाजी राळेभात, भारत काकडे, विलास जगदाळे, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment