Paris Olympic 2024:मनू अंतिम फेरीत, लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरी जिंकली, हॉकीमध्ये भारत जिंकला - Rayat Samachar
Ad image

paris olympic 2024:मनू अंतिम फेरीत, लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरी जिंकली, हॉकीमध्ये भारत जिंकला

67 / 100

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

paris olympic 2024 सातवा दिवसही भारतासाठी खास होता. मनू भाकरने २५ मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पदकांच्या हॅट्ट्रिककडे वाटचाल केली. तर बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनने शानदार विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन पुरुष एकेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षांनंतर हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव करून चाहत्यांची मने जिंकली.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. तिने अचूक फेरीत २९४ आणि जलद फेरीत २९६ गुण मिळवले. मनूची एकूण गुणसंख्या ५९० होती आणि तिने २४ एक्स गुण मिळवले. हंगेरीची मेजर वेरोनिका प्रथम राहिली. तिने अचूक फेरीत २९४ आणि जलद फेरीत २९८ गुण मिळवले. वेरोनिकाची एकूण गुणसंख्या ५९२ होती आणि तिने २७ एक्स म्हणजेच परफेक्ट १० गुण मिळवले. मनूने सलग तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. याआधी, तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि सरबजोत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. दोन्ही प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले. मनूला पदकांची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. मनू उद्या म्हणजेच शनिवारी २५ मीटर पिस्तुल स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. प्रीसीझन फेरीनंतर मनू तिसऱ्या स्थानावर होती. त्याचवेळी, याच स्पर्धेत आणखी एक भारतीय नेमबाज ईशा सिंग ५८१ गुणांसह १८ व्या स्थानावर राहिली. तिने अचूक फेरीत २९१ गुण मिळवले, तर जलद फेरीत २९० गुण मिळवले. मनूचा अंतिम सामना शनिवारी दुपारी एक वाजता होणार आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

भारतीय हॉकी संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी हरमनप्रीत सिंगच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. यासह भारत उपांत्यपूर्व फेरीपूर्वी विजयी मार्गावर परतला आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने ऑस्ट्रेलियाला ५२ वर्षानंतर पराभूत केले आहे. यापूर्वी १९७२ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या क्वार्टरच्या १२व्या मिनिटाला अभिषेकने गोल नोंदवला आणि भारताने १-० अशी आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यासह भारताने २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचे खाते दुसऱ्या क्वार्टरमध्ये उघडले. २५व्या मिनिटाला क्रेग थॉमसने गोल केला आणि संघाचा स्कोअर २-१ असा झाला. २६व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला जो हरमनप्रीत सिंगने वाचवला. मध्यंतरापर्यंत भारत २-१ ने आघाडीवर होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यासह भारताने ३-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या क्वार्टरमध्ये ५५व्या मिनिटाला ब्लेक गोव्हर्सने ऑस्ट्रेलियासाठी गोल करत ऑस्ट्रेलियाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. यासह भारताने विजयाची नोंद करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारतीय संघ गट फेरीत बेल्जियमच्या मागे तीन विजय, एक अनिर्णित आणि एक पराभव यासह दुसर्‍या स्थानावर आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना गट अ मधून तिसर्‍या स्थानावरील संघाशी होईल.

धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकट या मिश्र दुहेरीच्या तिरंदाजी जोडीचा कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेचा सामना झाला, परंतु भारतीय जोडी २-६ ने पराभूत झाली. अशाप्रकारे धीरज आणि अंकिताचे ऐतिहासिक कांस्यपदक हुकले.

भारतीय ज्युडो खेळाडू तुलिका मान शुक्रवारी येथे लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन क्युबाच्या इडेलिस ऑर्टिजविरुद्ध पराभूत होऊन महिलांच्या ७८ किलोपेक्षा जास्त वजनी गटाच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दिल्लीच्या २२ वर्षीय तुलिकाला क्युबाच्या खेळाडूविरुद्ध ०-१० असा पराभव पत्करावा लागला. क्युबाच्या या खेळाडूच्या नावावर चार ऑलिम्पिक पदके आहेत, ज्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक आहे. तुलिका ऑर्टिजविरुद्ध केवळ 28 सेकंद टिकू शकली.

भारतीय धावपटू बलराज पनवारने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष एकल स्कल्स स्पर्धेत २३वे स्थान मिळवून शुक्रवारी अंतिम डी मध्ये पाचवे स्थान मिळवून आपली मोहीम संपवली. अंतिम डी मध्ये बलराजची सात मिनिटे २.३७ सेकंदाची वेळ ही त्याची सध्याच्या खेळांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. ती पदकाची फेरी नव्हती. पॅरिस ऑलिम्पिकच्या नौकानयन स्पर्धेत भारताचा एकमेव सहभागी बलराज, क्वार्टर हीट शर्यतीत पाचव्या स्थानावर राहिला. बलराजने रविवारी रेपेचेज फेरीच्या शर्यतीत दुसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. शनिवारी त्याने पहिल्या फेरीतील हीटमध्ये चौथे स्थान मिळवून रिपेचेज गाठले.

भारतीय गोल्फपटू शुभंकर शर्माने शुक्रवारी येथे पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या फेरीत २५ व्या क्रमांकावर राहिला. आणखी एक भारतीय, गगनजीत भुल्लर ५२ व्या क्रमांकावर राहिला.

भारताच्या अंकिता आणि पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत अनुक्रमे २० आणि १४ व्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत. हीट वनमध्ये अंकिताने १६:१९.३८ अशी वेळ नोंदवली आणि ती शेवटची राहिली. तर पारुलने १५:१० वेळेसह सत्रातील सर्वोत्तम कामगिरी केली पण २० धावपटूंपैकी १४ व्या स्थानावर राहिली. दोन्ही हीटमधील अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. लक्ष्यने तैवानच्या चू टिन चेनचा १९-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव केला. लक्ष्य सेनने भारतीय बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चू टिन चेनविरुद्ध तीन गेमच्या रोमहर्षक विजयासह, सेनने अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे यापूर्वी कोणताही भारतीय पुरुष शटलर पोहोचला नव्हता. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य आता पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला आहे. आता तो पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. लक्ष्यपूर्वी किदाम्बी श्रीकांत (२०१६) आणि पारुपल्ली कश्यप (२०१२) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पॅरिसमधून बॅडमिंटन पदकाची भारताची एकमेव आशा सेन आहे.

तजिंदरपाल सिंग तूर १८.०५ मीटर फेक करून पुरुषांच्या शॉटपुटच्या अंतिम फेरीत पात्र ठरू शकला नाही. तो अ गटात १५ व्या स्थानावर राहिला.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment