अहमदनगर (प्रतिनिधी) २१.६.२०२४
शहरात कायदा सुव्यवस्था बिघडवल्या संदर्भात पोलिसांच्या तावडीत असलेला श्री बागेश्वर धाम सेवा समिती राज्य सहसंयोजक कुणाल भंडारी न्यायालयातून फरार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्य क्षमतेविषयी नागरिकांमधे उलटसुलट चर्चा होत आहे.
निवडणूकाजवळ आल्यावर शहरात शांतता भंग करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. विधानसभा निवडणूका येत्या काळात गाजण्याची चिन्हे असल्याने शहरात शांतता राखणे हे सर्व जातीधर्माचे काम आहे. त्यासाठी सर्वधर्मिय समविचारी मंडळींनी एकत्र येत शहराचे वातावरण शांत राखण्याचे काम करावे लागणार आहे.
श्री बागेश्वर धाम सेवा समिती राज्य सहसंयोजक कुणाल भंडारी न्यायालयातून फरार; पोलिसांची नाचक्की !
Leave a comment