अहमदनगर | १८ जानेवारी | रसिका लायल चावला
(health) द सालव्हेशन आर्मी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल, समता फाउंडेशन यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिरामधून मोफत शस्त्रक्रियेसाठी एच.व्हि. देसाई नेत्र रुग्णालय पुणे येथे २० नेत्ररूग्ण शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.
(health) बूथ हॉस्पिटलमध्ये शनिवारी रोटरी क्लब, गरुड कॅन्सर हॉस्पिटल, एन.सी.डी. सेल सिव्हिल हॉस्पिटल, केअरिंग फ्रेंड्स स्नेहालय, समता फाउंडेशन, एच.व्हि. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामधे ४०० रुग्णांची तपासणी केली होती. त्यामधून आज २० रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले.
यावेळी नेत्रतज्ञ डॉ.शुभम बोज्जा, बूथ हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, समता फाउंडेशनचे अभिषेक शिंदे, डेनिसन परमार, अमित पठारे, सुशील वाघमारे यांच्यासह अन्य शिबिरार्थी उपस्थित होते.
हे ही वाचा : history: खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !