श्रीगोंदा | ११ जानेवारी | माधव बनसुडे
Sports राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर तालुका- साक्री, जिल्हा- धुळे येथे ता. १० व ११ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या शालेय राज्यस्तरीय तेग सु-डो स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा मधील खेळाडू कु. हर्षल झगडे ५८ किलो ग्रॅम व कु. सुजित शिंदे ६२ किलो ग्रॅम मध्ये यांनी आपापल्या वजन गटांमध्ये उल्लेखनीय व प्रेक्षणीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला.
(Sports) विजयी खेळाडूचे महाविद्यालयीन विकास समिती चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप, महावीर पटवा, कॉलेजचे प्राचार्य महादेव जरे साहेब, जूनि. उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर, डॉ. प्रकाश साळवे, प्रा. सुदाम भुजबळ, प्रा. नितीन थोरात सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडू सुजित व हर्षल यांना कोच चंद्रकांत राहिंज , क्रीडा शिक्षक संजय डफळ, शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन मिळाले.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर