‘व्यंध्यत्व’ विषयावर इंटरसिस्टीम सेमिनारचे आयोजन
अहमदनगर | ११ जानेवारी | प्रतिनिधी
(business) काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचे (memorial award) वितरण रविवारी ता. १२ जानेवारी रोजी कै. काकासाहेब यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली.
(business) डॉ.म्हस्के म्हणाले, यंदा ‘आरोग्यभूषण’ या पुरस्काराने जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉ.शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर गौरविले गेले असून आंतरराष्ट्रीय (international) संस्थांसोबत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लखनऊ (university) तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त डॉ.सुमति म्हस्के, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ.दिप्ती ठाकरे, संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के काॅलेजचे प्राचार्य विवेक रेगे, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार आदींनी केले.
याप्रसंगी कै.काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचे संस्था आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येणार असल्याचे डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले. कै.काकांची नाळ आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरिबांशी जुळलेली होती. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरसिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून यंदा ‘वंध्यत्व’ या विषयावर डॉ.विनोद शहा यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेसोबत कार्याचा ठसा उमटवलेले डॉ. सुभाष साळुंखे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच डॉ.शहा आणि डॉ.साळुंखे या बी.जे मेडिकल कॉलेजच्या माझ्या वर्गमित्रांचे आम्हाला कौतुक वाटत असल्याचे डॉ.म्हस्के म्हणाले.
डॉ.सुभाष म्हस्के पुढे म्हणाले, बी.जे मेडिकल कॉलेजला असताना डॉ. विनोद शहा, डॉ. सुभाष साळुंखे आणि मी असे आम्ही तिघेही वर्गमित्र होतो. डॉ. साळुंखे यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जागतिक स्तरावर नामांकित असलेल्या संघटनेसोबत आपल्या सहकाऱ्याने काम करावे, हे खूपच अभिमानास्पद असल्याचे डॉ.म्हस्के म्हणाले.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?