वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षा, सायबर सुरक्षा, महिला व बाल सुरक्षेबद्दल जागृती
रायगड | ८ जानेवारी | सोपान अडसरे
(mumbai news) खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल विद्यालयात मंगळवारी खालापूर तालुका पोलीस विभाग आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने ‘पोलीस रेझिंग’ साजरा करण्यात आला. यावेळी पीएसआय झुंबरे, पीएसआय राजेंद्र आरोळे, सहाय्यक फौजदार गभाळे, सहाय्यक फौजदार सताणे, पोलीस हवालदार बागुल, शिंदे, पोलीस नाईक गर्जे, सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम, अमोल मोरे, प्रफुल्ल विचारे, रोशन मोरे आदी उपस्थित होते.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
(mumbai news) कार्यक्रमाचे स्वागत व्ही.जी. पाटील यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एल. प्रक्षाळे यांनी केले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षा, सायबर सुरक्षा, महिला व बाल सुरक्षा आदींची माहिती देण्यात आली. वाहतूक विभागामार्फत वाहतूक सुरक्षा, वाहतुकीचे नियम याची माहिती देण्यात आली तसेच विविध शस्त्रे दाखविण्यात आली. पोलीसभरती विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन वाय.डी. दरेकर, अडसरे सर यांनी केले तर सहकार्य एस.यू. पवार यांनी केले. आभार व्ही.जी. पाटील यांनी मानले.
हे ही वाचा : विद्यार्थ्यांना उपयुक्त मराठी विश्वकोश येथे वाचा