मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

Ahilyanagar News: निंबळक माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Follow Us:
---Advertisement---
64 / 100 SEO Score

नगर तालुका | पंकज गुंदेचा |२५ डिसेंबर
Ahilyanagar News येथील ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. ता. १७ डिसेंबर २०२४ रोजी या स्नेहसंमेलनाचे पहिले पुष्प गुंफले गेले. कार्यक्रमाचे उद्घाटन लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिक आणि ऑटोमेशन कंपनीचे डायरेक्टर अरविंद पारगावकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते व माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर होते.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये उद्योजक बाबुशेठ टायरवाले, उद्योजक नागेंद्र राठोड, उद्योजक राजेंद्र दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश कोतकर , रामदास भोसले, एनडी फार्मसी कॉलेजचे सचिव विक्रम कासार , रावजी नांगरे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद पारगावकर यांनी विद्यार्थ्यांना ‘आईस्क्रीम’ या शब्दाचा अनोखा अर्थ सांगत आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता, आणि महत्वाकांक्षा यांचे महत्व पटवून दिले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ कोरगांवकर यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळ आणि संचालक मंडळातील प्रमुख सदस्यांनीही हजेरी लावली. या मंडळातील प्रमुखांमध्ये अध्यक्ष नितीन कोतकर, सचिव रघुनाथ गव्हाणे,उपाध्यक्ष पंढरीनाथ लामखडे, डॉ. किसन कोतकर, कविता कासार, मनोज गायकवाड, संदीप कोतकर , जयश्री म्हस्के, संदीप कळसे , वैशाली गव्हाणे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रहाटळ बी के, पर्यवेक्षक मगर व्ही एम, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी हेंबाडे , विद्यार्थी प्रतिनिधी महेश कोतकर , विद्यार्थीनी प्रतिनिधी समीक्षा शेवाळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या आदर्शशिक्षिका संगीता जाजगे यांनी केले.

 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment