स्वतःसह जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी
अहमदनगर | २० डिसेंबर | प्रतिनिधी
(Ahilyanagar News) जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून जिल्ह्याचे किमान तापमान बहुतांश वेळा १०° सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याचे भारतीय हवामान खात्याच्या स्वयंचलित हवामान केंद्रावरील नोंदीनुसार आढळून आले. आगामी कालावधीत देखील थंडीच्या लाटेदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरून नागरिकांचे थंडीपासून संरक्षण होईल, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शाहुराज मोरे यांनी केले.
(Ahilyanagar News) त्यांनी सावधगिरीबाबत सांगितले की, थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामानाच्या अंदाजाची रेडिओ, टी.व्ही. व वर्तमानपत्रामध्ये प्रसारीत होणाऱ्या बातम्यांद्वारे माहिती मिळावावी. हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हात व पायमोजे तसेच रग, चादर यासारखे इतर पुरेसे उबदार कपडे वापरावेत. थंडीची लाट आली असताना शक्यतो घरातच थांबावे, थंड वाऱ्यापासून बचावासाठी शक्यतो प्रवास टाळावा. स्वतःला कोरडे ठेवावे. शरीर ओले असल्यास त्वरील कपडे बदलावे, ज्याद्वारे शरीरातील उष्णता कमी होणार नाही. शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी निरोगी अन्न खावे. पुरेशी प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन-सी, समृद्ध फळे आणि भाज्या खाव्यात. नियमितपणे गरम द्रव्य / पेय प्यावे, कारण यामुळे थंडी दरम्यान शरीरातील उष्णता कायम राहील. घरातील वृद्ध लोकांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. थंडीत दीर्घकाळ राहिल्यास त्वचा निस्तेज आणि बधीर होऊ शकते. निस्तेज पडलेली हातापायांची बोटे, कानाची पाळी व नाकाचा शेंडा इ. लक्षणांकडे लक्ष द्यावे. अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीने शरीराचा थरकाप होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे लक्षण असलेने तात्काळ खुल्या जागेतून निवाऱ्याच्या ठिकाणी जावे. परिस्थिती बिघडत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. पाळीव प्राण्यांना घरामध्ये व सुरक्षित ठिकाणी हलवा. त्याचप्रमाणे पशुधन किंवा पाळीव प्राण्यांचे थंड हवामानापासून संरक्षण करावे.
सर्व नागरिकांनी हिवाळ्याच्या कालावधीत स्वतःसह जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय वा 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे शाहुराज मोरे यांनी केले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.