अहमदनगर |२६ डिसेंबर | प्रतिनिधी
Ahilyanagar News अहमदनगर रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील घनकचरा विभागाचे अधिकारी राम साठे यांनी विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापनाविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात कचऱ्याचे विविध प्रकार, त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण, साठवणूक, आणि कचरा गाडीपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, कचऱ्यापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची जाणीव निर्माण करणे आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणे होता.
यावेळी “माझी वसुंधरा” शपथही घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घनकचरा विभागातील मा. घोरपडे , शुभम पाटील, सुदर्शन अंधारे, ऋषिकेश लांडगे, अभिषेक उमाप यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मनिषा गिरमकर, शिक्षक विठ्ठल आठरे, मेघना गावडे, शबनम खान, तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा : नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी