पुण्यातील धरणे आंदोलनात विमा प्रतिनिधी एकवटले
अहमदनगर | २२ डिसेंबर | विजय मते
Pune News 1ऑक्टोबर नंतर एलआयसी कडून काही नवीन विमा योजना जाहीर केल्या. त्यामध्ये विमा प्रतिनिधींना मिळणाऱ्या पहिल्या वर्षाच्या कमिशनमध्ये कपात करून विमाधारकाने घेतलेली विमा पॉलिसी सरेंडर केली तर विमा प्रतिनिधीला मिळालेले सर्व कमिशन वसूल करण्यासाठी नव्याने बनविलेला क्ला बॅक हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी विमा प्रतिनिधींच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पुणे येथे एलआयसी विभागीय कार्यालयासमोर ऑल इंडिया लि.(आफी) संघटनेच्या पुणे विभाग 1आणि 2 तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर, पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हातील विमा प्रतिनिधी एकवटले होते. या आंदोलनात ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स फेडरेशनच्या पश्चिम क्षेत्रीय विमा प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाध्ये संघटनेच्या पुणे1विभागाचे सचिव प्रमोद कुमार छाजेड पुणे विभाग2चे सेक्रेटरी रमेश कांबळे उपाध्यक्ष दिलीप मुंदडा संघटक सचिव संजय नवघणे, डॉ सोमनाथ देवकाते, माधव जोशी, तसेच विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे विभागीय कार्यालयाला दिलेल्या निवेदनात संघटनेने विविध महत्त्वाच्या मागण्या केल्या. यामध्ये विमा पॉलिसी वरील जीएसटी त्वरित रद्द करावा, विमाधारकांना मिळणाऱ्या बोनस मध्ये वाढ करावी, विमा प्रतिनिधींना मिळणाऱ्या कमिशन, मेडिक्लेम, ग्रॅज्युटी, मध्ये वाढ करावी तसेच सर्वसामान्य उमेदवारांना पॉलिसी घेण्यासाठी पहिल्याप्रमाणेच एक लाखाची पॉलिसी चालू असावी आदी मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राज्यातून आलेल्या विमा प्रतिनिधींनी दिला.
या धरणे आंदोलनात रणजीत डांगे, अजय भंडारी, प्रशांत तरडे, मधुकर जठार, जयप्रकाश शहा, रामनाथन, महेश गुगळे, गणेश रजपूत, मनमोहन राज पुरोहित, हरीश अण्णम, नंदकिशोर खिरोडे, वसुधा जोशी, मीना भंडारी, संदीप साखरे, अशोक सुरा, राहेल वागळेकर, कदिर बेपारी, श्रीमती शितल गोरे यांनी देखील सहभाग नोंदविला.
हे हि वाचा : जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ