‘वारसा वृक्ष’ कत्तलीची चर्चा, वृक्ष प्राधिकरण समिती : असून अडचण, नसून खोळंबा
अहमदनगर | २० डिसेंबर | प्रतिनिधी
(Ahilyanagar News) शहरातील जिल्हा पोलीस (हेडक्वार्टर) मुख्यालयाच्या परिसरातील बेकायदेशीरपणे २० ते २५ झाडे तोडल्याप्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल होऊन प्रत्येकी झाड ५०,००০/- रुपये प्रमाणे दंड वसूल करून संबधीत दोषी विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक शाकीर शेख यांनी मनपा आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण सामितीचे अध्यक्ष यशवंत डांगे यांच्याकडे केली.
(Ahilyanagar News) अधिक माहिती देताना शेख यांनी सांगितले, अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे पोलीस कॅन्टीन जवळ व परिवहन शाखा (एम.टी) व इतर ठिकाणी असलेले मोठे झाडे ११/१२/२०२४ व त्यानंतरच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर झाडांची ‘कत्तल’ करण्यात आली. झाडे तोडण्यापुर्वी वृक्षप्राधिकरण समितीकडून कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता झाडे तोडली, ही बाब अतिशय गंभीर असून झाडांमध्ये ‘पुरातन वृक्ष’ असल्याचे बोलले जाते.
पुढे शेख म्हणाले, या झाडांमुळे कोणताही अडथळा होत नसताना किंवा ते झाडे पडण्यासारखी झालेली नव्हती. मजबुत व सक्षम असताना जमिनीपासून तोडण्यात आले. मुख्यालयावर पोलीस उपअधीक्षक गृह यांचे नियंत्रण असते. त्यांच्या नियंत्रणाखाली ही झाडे कोणी तोडली? त्याची कोठेही चौकशी करण्यात आलेली नाही किंवा संबधीतांविरोधात कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही.
ते पुढे म्हणाले, महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीकडूनसुध्दा स्वतःहून कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल होऊन प्रत्येकी झाड ५०,००০/- रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात यावा, संबधीत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शाकीर शेख यांनी केली.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.