‘कौटुंबिक कलहातील कटाचा बळी’ ठरल्याचा शिंदेंचा गंभीर आरोप
जामखेड | ३० नोव्हेंबर | प्रतिनिधी
Ahilyanagar News विधानसभा निवडणुकीत मविआतील अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हिएम फेरतपासणीची मागणी केली असताना आता रा.स्व. संघ भाजपच्या उमेदवारानेही ईव्हिएमवर शंका उपस्थित केली. कर्जत- जामखेडचे रा.स्व. संघ भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील १७ बूथवरील ईव्हीएमची फेरतपासणीची मागणी केली. यासाठी राम शिंदे यांनी ८ लाख २ हजार ४०० रुपये शुल्क शासनानकडे भरले.
कर्जत जामखेडमधील (Ahilyanagar News) विधानसभा निवडणूक अटीतटीची झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी ही निवडणूक अवघ्या १२४३ मतांनी जिंकली. हा पराभव मात्र राम शिंदेंच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी कर्जत-जामखेडमधील १७ बूथवरील ईव्हीएमच्या फेरतपासणीची मागणी केली. त्यासाठी लाखो रुपयेही भरले.
अजित पवारांनी (Ahilyanagar News) कर्जत जामखेडमध्ये सभा न घेणे हे तिथले महायुतीचे उमेदवार राम शिंदेंच्या चांगलेच जिव्हारी लागले. मी अजित पवारांना सभा घेण्यासाठी वारंवार विनंती केली, मात्र त्यांनी शेवटपर्यंत सभा घेतली नाही. त्यामुळे रोहित पवारांना फायदा झाला, असा राम शिंदेंच्या वक्तव्याचा मतितार्थ आहे.
कर्जत जामखेडमध्ये निकालानंतर पराभूत झालेले भाजप नेते राम शिंदेंनी, अजित पवारांवर गंभीर आरोप केले. राम शिंदेंनी आपण ‘कौटुंबिक कलहातील कटाचा बळी’ ठरल्याचा गंभीर आरोप केला.