Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > निवडणूक > Politics: १०५ घटना दुरुस्तीपैकी काॅंग्रेस राजवटीत ९१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली – विनायक देशमुख
निवडणूकव्यापारसत्ताकारण

Politics: १०५ घटना दुरुस्तीपैकी काॅंग्रेस राजवटीत ९१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली – विनायक देशमुख

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 18.11.2024 10:27 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

राहुरी | १८ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Politics राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता सभा राहुरी येथे आयोजित करण्यात आली. यावेळी विनायक देशमुख म्हणाले, आतापर्यंत करण्यात आलेल्या १०५ घटना दुरुस्त्यांपैकी काॅंग्रेस राजवटीत ९१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने आरक्षण व संविधानाबाबत खोटा प्रचार करुन मतदारांची दिशाभूल केली. देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू असताना आदिवासी व मागास घटकांच्या आरक्षणात कोणताही बदल होणे कदापि शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारुन आता सहा महिने होऊन गेले. या कालावधीत मोदी सरकारने संविधानाला कुठेही धक्का लावला नाही.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) गट ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असुन आपल्या पोराबाळांचे आणि नातेवाईकांचे हितसंबंध जपणे, त्यांना राजकीय रोजगार निर्माण करुन देणे, यासाठीच हा पक्ष कार्यरत असल्याची टिका देशमुख यांनी केली.

   यावेळी मंचावर उमेदवार शिवाजी कर्डिले, रा.स्व. संघाचे राहुल सोलापुरकर, सुभाष पाटील, ॲड. करपे, राजु शेटे, सत्यजित कदम, धनंजय गाडे, अण्णासाहेब बाचकर यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजी कर्डिले यांना विजयी करावे, असे आवाहन विनायक देशमुख यांनी केले.

हे हि वाचा : Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा

TAGGED:politicsकॉंग्रेसबीजेपीरा.स्व.संघराहुरीविनायक देशमुख
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Cultural Politics: हिंदुत्ववाद्यांनी मतदान करायचे कोणाला ? कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार उत्कर्ष गिते यांचा सवाल
Next Article Crime: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestअहमदनगरताज्या बातम्यानिवडणूक

Politics | प्रचाराची दमदार सुरुवात; मतदारसंघात गोविंद मोकाटेंना उत्स्फूर्त प्रतिसाद

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआर्थिकआवाहनताज्या बातम्यानोकरी विषयकमहाराष्ट्रव्यापार

Business | ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत; सुमारे 2 हजार कंपन्यांसोबत करार

By रयत समाचार वृत्तसेवा
अहमदनगरताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

Politics | निवडणूक केवळ राजकीय सत्तासंघर्ष नसून, ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा लढा- मोकाटे; ‘घराणेशाही’ भाजपवर हल्लाबोल

By रयत समाचार वृत्तसेवा
अहमदनगरकायदाताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

High Court | न्यायालयातही विखेंचा पराभव; याचिका फेटाळली; लंकेंचा विजय

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?