मुंबई | १८ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election येथील सजग नागरिक मंच यांनी महाराष्ट्रातील मतदारांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा संदेश पाठविला आहे. यामधे त्यांनी आवाहन केले आहे, तुमच्या मताचा दर्जा, हाच तुमच्या सरकारचा दर्जा आहे, हे आधी लक्षात घ्या. आपल्या योग्य भविष्यासाठी मतदान करताना उमेदवाराची पार्श्वभूमी, दर्जा, ब्रँड लक्षात घ्या. पक्ष पाहून मतदान करण्याचा काळ आता इतिहास जमा झालेला आहे कारण सर्वच राजकीय पक्ष मूल्य, विचारधारा शून्य, नैतिकता शून्य, तत्वशून्य, प्रामाणिकता शून्य, भ्रष्टाचाराने बरबटलेले, भरकटलेले झालेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता यापेक्षा उमेदवार कसा हे पाहून मतदान करा.
पुढे म्हटले, १० रुपयांची कोथिंबीर जुडी घेताना तीचा दर्जा लक्षात घेता ना ? ५/१० जुड्या वरखाली करून कोथिंबीर जुडी निवडता ना? मोबाईल घेताना बाजारात उपलब्ध असणाऱ्या मोबाईलपैकी सर्वोत्तम मोबाईलची निवड करतात ना शर्ट-पॅन्ट घेताना त्याचा ब्रँड लक्षात घेऊनच निवड करतात ना ? स्वतःच्या मुलीसाठी सर्वोत्तम ‘वर’ अथवा मुलासाठी सर्वोत्तम ‘वधू’ निवडतात ना? अहो ! एवढेच कशाला, अगदी चप्पल घेताना देखील सर्वोत्तम ब्रॅण्डचीच चप्पल निवडली जाते.
मग प्रश्न हा आहे की, ज्या उमेदवाराच्या हातात आपले भविष्य घडवण्याचा अधिकार दिला जातो, त्या व्यक्तीची निवड करताना मात्र त्या उमेदवाराचा दर्जा न पाहता भावनिक दृष्टीने, विचारशून्य पद्धतीने मतदान करणे कितपत रास्त ठरते ? असा सवाल मंचने विचारला आहे.
उमेदवाराचा दर्जा, ब्रँडचा विचार न करता मतदान म्हणजे दर्जाहीन व्यवस्थेची पेरणी करणे होय. आजवर आपण दर्जा न पाहता केवळ भावनिक मुद्यांच्या आधारे अयोग्य उमेदवाराला मतदान केल्यामुळे किती नुकसान झालेले आहे याचा सुज्ञपणे विचार करा, असे आवाहन केले आहे.
… आणि म्हणूनच आपणांस मंचच्या वतीने विनंती आहे की, तुम्हाला उत्तम सरकारी शाळा हव्या असतील, उत्तम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हवी असेल, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी असेल, एकुणातच राज्याचा कारभार उत्तम हवा असेल तर लोकशाहीच्या दृष्टीने साक्षर नागरिक या भूमिकेतून मतदान करताना ‘उत्तम, दर्जेदार, प्रामाणिक, शिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असणाऱ्या आणि कमीत कमी भ्रष्टचारी असणाऱ्या, आजच्या काळात भ्रष्टाचार न करणारा उमेदवार सापडणे केवळ आणि केवळ अशक्य आहे. उमेदवारालाच ‘स्वतः प्रामाणिक राहून’ मतदान करावे.
नागरिक प्रामाणिक असतील तर आणि तरच प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था प्रामाणिक निर्माण होऊ शकेल आणि म्हणूनच मंचच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की लोकशाहीच्या दृष्टीने साक्षर नागरिक या भूमिकेतून मतदान करताना उमेदवार निवडताना दर्जा लक्षात घ्या.
स्वतःला पाचशे हजारात, ५/१० हजारात विकले जाऊ नका. बाजारात अगदी गाढवाची किंमत देखील ३०/४० हजार असते मग तुमची किंमत गाढवापेक्षा देखील कमी का करता ?
असे स्पष्ट आवाहन मुंबई येथील सजग नागरिक मंच यांनी केली. अधिक माहितीसाठी
[email protected] या ईमेल व 9869226272 क्रमांकावर संपर्क साधावा.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.