अहमदनगर | १७ नोव्हेंबर | प्रतिनिधी
गुन्हेगारी घटनेशी संबंधित व्यक्तींना निवडणूक Election बूथवर नियुक्त केले जाणार नाही, याबाबतची दक्षता राजकीय पक्ष आणि उमेदवाराने घेणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले,मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत.
Election मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्रे असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरिता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरिता २०० मीटर त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल. प्रत्येक निवडणूक बूथवर केवळ १ टेबल व २ खुर्चा तसेच १० x १० फूट पेक्षा मोठा नसेल असा छोटा तंबू उभारता येईल. निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकतेनुसार शासकीय प्राधिकरणे तसेच स्थानिक प्राधिकरणे यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहिल. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये. निवडणूक बूथ शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येऊ नये. अशा निवडणूक बूथवर पक्षाचा ध्वज आणि पक्षाचे चिन्ह लावता येणार नाही.