शेवगाव | १२ ऑक्टोबर | लक्ष्मण मडके
येथील Agriculture कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर जुन्या कांद्याला ८१०० रुपये उच्चांकी भाव मिळाला. ता. ११ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळा कांदा खरेदी शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लिलावामध्ये रावतळे येथील शेतकरी विजय शिंदे यांच्या जुन्या कांद्याला ८१०० तर इतर कांद्याला १९०० पासून ४८०० रुपये भाव मिळाला.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातील सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी गोणी कांदा मार्केट सुरु राहणार. मार्केटमध्ये कांद्याला ४१०० रुपयांपर्यंत दर मिळला. तर शुक्रवारपासून मोकळा कांदा खरेदीस सुरुवात करण्यात आली. येथे पहिल्याच दिवशी १५ वाहनांव्दारे मोकळा कांदा आला. त्यामध्ये ८१०० पासून १९०० रुपयांपर्यत भाव मिळाला. आठवड्यातील मंगळवार व शुक्रवारी मोकळा कांदा मार्केट सुरु राहणार आहे.
यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संचालक संजय कोळगे, अशोक धस, अशोक मेरड, जाकेर कुरेशी, हनुमान पातकळ, मनोज तिवारी, सचिव अविनाश म्हस्के, भुसार माल असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोतत्म धुत, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाऊ झांबरे, व्यापारी कैलास देहाडराय, गोकुळ खेडकर, विठ्ठल थोरात, राजेंद्र देवढे, गणेश लद्दे, संपत ढाकणे, गणेश बोरा, सतिष सोनवणे, मोहसीन शेख, शेतकरी हनुमंत ठोंबळ, राजेंद्र गोबरे, जालिंदर गोबरे, बाबासाहेब काळे, नवनाथ गोबरे, नानासाहेब कराळे, श्रीकृष्ण चेडे, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल परदेशी, कृष्णा मोटकर, गोरख पाडळे, गोकुळ परदेशी, किशोर मगर आदी उपस्थित होते.
घुले बुंधुंच्या मार्गदर्शनाखाली मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर देण्यासाठी व इतर सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहोत. शेवगावसह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती एकनाथ कसाळ यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा