अहमदनगर |९ ऑक्टोबर | प्रतिनिधी
ahmednagar news येथील कै. काकासाहेब म्हस्के मेमोरीयल मेडिकल फौंडेशनला बी. फार्मसी कोर्सची मान्यता मिळाल्याची माहिती कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली. यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, मे १९८३ पासून स्थापित कै. मा.आ.कि.बा.उर्फ काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशन या वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक ट्रस्टला सन १९८९ साली महाराष्ट्रातील बी.एच.एम.एस. या वैद्यकीय डिग्री शिक्षण अभ्यासक्रमास परवानगी मिळाली. ‘स्वयंरोजगार’ हे उद्दिष्ट केंद्रबिंदू ठेऊन कै. पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्युट सन २००२ साली आर.ए.एन.एम. व आर.जी.एन.एम. हे नर्सिंग कौन्सिल मान्य व महाराष्ट्र शासनमान्य कोर्सेस सुरु करून मागासवर्गीय, पिडीत व गरीब मुलींना नर्सिंग शिक्षणाची संधी देऊन त्यांना शासकीय, जि.प., नगरपालिका व खाजगी हॉस्पिटल मध्ये नोकरीची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली व २००६ साली काकासाहेब म्हस्के डी. फार्मसी कॉलेजला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व महाराष्ट्र शासन कोर्स सुरु करून स्वयंरोजगाराचे आणखी एक दालन सुरु करून अनेक मध्यमवर्गीय मुलामुलींना मेडिकल स्टोअर्स व फार्मास्युटीकल कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
ते पुढे म्हणाले, या सर्व शैक्षणिक संस्थेमध्ये उत्तम गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण यामुळे महाराष्ट्रामध्ये संस्थेचा नावलौकिक झाला. आधुनिक काळामध्ये फार्मसीमध्ये डिग्री कोर्सची आवश्यकता असल्याने संस्थेने त्या दृष्टीने सादर केलेला प्रस्ताव फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेने २०२४ या शैक्षणिक वर्षापासून ६० (साठ) प्रवेश क्षमतेचे बी. फार्मसी कॉलेजला प्रवेशासाठी मान्यता दिली असून त्यामुळे संस्थेची गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणसंस्था म्हणून लौकिकात भरच पडली आहे, अशी माहिती काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा