अहमदनगर | १२ सप्टेंबर | तुषार सोनवणे
येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात १४ वर्षाखालील मुलांच्या मनपा जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. यामधे १६ शालेय संघांनी सहभाग घेतला असून काल झालेल्या रेसिडेन्सिअल हायस्कुल विरुद्ध भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल उपांत्यपूर्व सामन्यात रेसिडेन्सिअल हायस्कुल संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संघनायकाचा निर्णय रेसिडेन्सिअल हायस्कुलच्या खेळाडूंनी सार्थ ठरवत अचूक गोलंदाजी करताना भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल संघाला २६/५ धावात रोखले. प्रतिउत्तरादाखल खेळताना रेसिडेन्सिअलच्या अनिकेत व आतिफ या सलामी जोडीने सुरवात करताच आतिफ हा ३ रानांवर झेल बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या वरदला बरोबर घेऊन अनिकेतने सामन्याची सर्व सूत्र हाती घेतली. कोणतीही पडझड होऊ न देता संयमी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
अनिकेतच्या नेत्रदीपक खेळीने संघाचा सहज विजय झाला त्याच बरोबर रेसिडेन्सियल हायस्कुलया संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अतिशय अवघड होते. चेंडू कधी खाली राहत होता तर कधी अचानक उसळी घेत होता. तरीही माझ्या संघाला जर अंतिम सामन्यात जायचे असेल तर मला फलंदाजी करणे गरजेचे होते, ते मी केले. माझ्या प्रशिक्षक सरांनी कोणत्या परिस्थितीत कशी फलंदाजी करायची, हे सांगितले होते आणि तीच गोष्ट मी केली, असे सामनावीर अनिकेत सिनारे याने सांगितले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
कृपया, येथे कॉमेंट लिहा