नाशिक | ६ सप्टेंबर | प्रतिनिधी
Crime कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमधे अकस्मात ४४/२०२३ दाखल होता. नाशिक सिडको राजरत्ननगर मधील अभिजीत राजेंद्र सांबरे याचा मृत्यु संशयास्पद झाला असल्याबाबत नातेवाईकांनी सांगितले होते. संशयास्पद मुत्यू अभिजीतसोबत असणारा प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असल्याबाबत संशय होता. गुन्हेशाखेचे मनोहर शिंदे यांनी अकस्मात मुत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित प्रमोद रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफीने ताब्यात घेतले.
संशयित प्रमोद रणमाळे यास वरीष्ठ पोनि विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस करता प्रमोद याने अभिजीत या मित्राचे पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन वाद विकोपास गेला. त्यामुळे प्रमोद याने अभिजीत यास मारण्याबाबत डाव आखलेला होता. ता. २७/०६/२०२३ रोजी आर्थिक व्यवहाराकरीता मयत हा येवला जि. नाशिक येथे जाणार होता. त्याने प्रमोद यास देखील तेथे येण्याबाबत कळविले होते. प्रमोद याने अभिजीत याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री ९ वाजता ब्लडप्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळुन दारू पाजली. त्यातुन अभिजीत याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला. अभिजीत याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पळून गेला.तशी कबुली दिली.
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३०७/२४ भादंविक ३०२ दाखल करण्यात आला. पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेकडील सपोनि समाधान हिरे, सपोउपनिरी यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुंद्रे आदींनी केली.
संबंधित बातमीचा व्हिडीओ पहा : https://youtu.be/43-cPahLWQU?si=lIcil2LGsyNgMBJu
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा