Cultural Politics: 'तुतारी'कडून विधानसभेसाठी हाजी शौकत तांबोळी यांची तयारी; अहिल्यानगर की अहमदनगर हे राकॉंशपकडून ठरलेले नसल्याने पुरोगामी कार्यकर्ते संभ्रमात - Rayat Samachar

Cultural Politics: ‘तुतारी’कडून विधानसभेसाठी हाजी शौकत तांबोळी यांची तयारी; अहिल्यानगर की अहमदनगर हे राकॉंशपकडून ठरलेले नसल्याने पुरोगामी कार्यकर्ते संभ्रमात

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
67 / 100

अहमदनगर | ५ सप्टेंबर | प्रतिनिधी

Cultural Politics येथील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, अर्थिक अश्या अनेक क्षेत्रात राज्यभर सक्रिय असणारे तंबोली हज टूर्सचे संचालक हाजी शौकत तांबोली यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अहमदनगर शहरातून उमेदवारी मागितली आहे.

राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रतिनिधी म्हणून रा.काँ.शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी अहमदनगर शहर २२५ विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके व कार्यालयीन प्रमुख अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अथर खान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद खलील, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष समीर पठाण, व्यापारी व उद्योग सेलचे अध्यक्ष अनंत गारदे, प्रदेश सचिव फारूक रंगरेज, फय्याज तांबोळी, जीशान खान, निसार बागवान, फरान रंगरेज आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी हाजी शौकत तांबोळी म्हणाले, अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागितली असून या जिल्ह्यासह, संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू, मुस्लिम, ओबीसी समाजाचे तसेच बहुजन समाजाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून काम करत असून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी असतो तसेच संपूर्ण जिल्हाभर व जिल्ह्याच्या बाहेर देखील जनसंपर्क दांडगा असुन अनेक संघटनांनी व समाजाने विधानसभा लढवण्याची विनंती केल्याने हा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची भावना व्यक्त केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ही ‘अहमदनगर’ नावाबाबत तळ्यातमळ्यात दुटप्पी भुमिका घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आरएसएसच्या सांस्कृतिक राजकारणाच्या जाळ्यात फसलेली दिसत आहे. त्यांच्या अनेक बॅनर, कार्यक्रमपत्रिकेवर ‘अहिल्यानगर’ असेच नाव लिहलेले असते. खा. लंके व इतर तुतारीवाले पदाधिकारी आरएसएसचा कार्यक्रम नकळतपणे फॉलो करताना दिसत आहेत. अहिल्यानगर हे नाव अद्याप सरकार दरबारी फायनल झालेले नाही. पक्षाने जाहीर करून सांगावे की, ते ‘अहिल्यानगर’ की ‘अहमदनगर’ नावासोबत आहेत, अशी अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांची भावना आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment