ठाणे | २७ ऑगस्ट | प्रतिनिधी
cultural महाराष्ट्रातील बहुश्रुत गायिका कवयित्री श्रुती पटवर्धन आणि उत्कृष्ट निवेदिका कवयित्री पल्लवी वढवेकर-बर्वे रसिक प्रेक्षकांसाठी नव्याकोऱ्या पावसावरील गीतांची व कवितांची मैफिल घेऊन आल्या आहेत. “तानापिहिनिपाजा…रंग पावसाचे ”
गंधारधून प्रायोगिक मंच प्रस्तुत पावसावरील कविता, गझल, गाणी व नृत्याविष्कार अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या या मैफिलीची गोष्ट तशी थोडी वेगळीच आहे. गंधारधून नावाप्रमाणेच स्वर आलापातील गंध, माधुर्य आणि गाण्यांची धून त्यांच्या सादरीकरणाद्वारे आपणास ऐकायला मिळते. आशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची रूपरेखा पाहण्याची मजा काही औरच आहे.
शनिवारी ता.२१ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे येथील सहयोग मंदीर, घंटाळी सभागृहात रात्री ६ ते ८.३० या वेळेत देखण्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या बहारदार कार्यक्रमासाठी आजच आपली जागा राखून ठेवा.
गंधारधूनच्या या कार्यक्रमात मान्यवरांमध्ये प्रदीप बडदे (कवी, लेखक, पत्रकार, निवेदक), दिशा देसाई (कथ्थक अलंकार) अनुराधा आंबोळे (गायिका), राज्ञीषा कुलकर्णी (कवयित्री) अशा काही बहुचर्चित पाहुण्यांच्या स्वरचित कविता, गझल व गाणी त्यांच्या स्वरमयी आवाजात ऐकण्यासाठी ही एक उत्तम पर्वणी आहे. निश्चितपणे हा कार्यक्रम बहारदार होणारच आहे त्यासाठी आपणा सर्वांनी पुरेपूर साथ द्यावी अशी रसिक प्रेक्षकांना आदराची विनवणी, आयोजकांनी केली आहे. अधिक माहिती बुकिंग आणि प्रयोगासाठी श्रृती पटवर्धन यांच्या 9004293081 क्रमांकावर संपर्क साधावा.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा