अर्बनच्या ‘एक कुटुंब, एक बँक’ ब्रिदवाक्यास लावला एका कुटूंबाने चुना !
अहमदनगर | २३ ऑगस्ट | प्रतिनिधी
२९१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या Crime घोटाळ्यामुळे नगर अर्बन बँकेचे ठेवीदार आणि सभासद हवालदिल झाले आहेत. त्यांच्या वतीने बँक बचाव समिती न्यायासाठी लढा देत आहे. ठेवीदारांसह सभासदांना दिलासा देणारी बातमी आर्थिक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना मिळाली होती. आरएसएसबीजेपीचे माजी खासदार दिलीप गांधी त्यांच्या बंगल्यात अर्बनच्या आर्थिक घोटाळ्यातील पाच मुख्य आरोपी रक्षाबंधनासाठी एकत्र आल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यात काही महिला आरोपींचादेखील समावेश होता. मात्र काहीतरी राजकीय दबाव आला आणि दिवंगत माजी खासदार गांधींच्या बंगल्यावर आरोपींना पकडायला गेलेले पोलीस स्टेअरिंगसह हात हलवत परत आल्याची जोरदार चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. काही माध्यम प्रतिनिधीही तेथे गेले असता पोलिसांनी काहीच सापडले नसल्याचे सांगितले.
जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध असलेली वैभवशाली अर्बन बँकेमधे तब्बल २ लाख ठेवीदारांनी ३५० कोटी रूपयांच्या ठेवी मोठ्या विश्वासाने ठेवल्या होत्या. त्यात शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, कष्टकरी, भाजी वाले, पेन्शनर आदींचा समावेश आहे. मात्र शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही बँक व्हाईटकॉलर क्रिमिनल्स यांनी संगनमताने बुडविली. सर्व ठेवीदेखील बुडतात की काय,अशी शंका ठेवीदारांमधून व्यक्त केली जात असताना बँक बचाव समिती पुर्वीपासून पाठपुरावा करत असल्याने ठेवीदार उशिरा समिती सोबत आले. पोलिसांना या आर्थिक घोटाळ्यातले मुख्य आरोपी सापडत नाहीत. जोपर्यंत मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत, तोपर्यंत या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाला अजिबात गती येणार नाही, हे जळजळीत वास्तव असल्याची जाणीव अजूनही प्रशासनाला होत नाही का काय अशी चर्चा ठेवीदार करत आहेत.
वैभवशाली अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याच्या तपासात पोलिसांचे भरपूर प्रयत्न सुरु आहेत. मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत मात्र आतापर्यंत तरी पोलिसांच्या पदरी निराशाच आलेली दिसून येत आहे. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी ते एक तर नामधारी तरी आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.
ज्या बँकेचे ब्रीदवाक्य ‘एक कुटुंब, एक बँक’ आहे. ज्यांच्या नावाभोवती या बँकेचा हा आर्थिक घोटाळा फिरत आहे, त्या दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र आरएसएस भाजपाचे राज्य पदाधिकारी सुरेंद्र गांधी, त्यांच्या सुविद्य पत्नी, राजमाता, बंधू आणि अन्य मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांना चकवा देत आहेत. या घोटाळ्यातले मुख्य पाच आरोपी दिवंगत माजी खासदार गांधी यांच्या बंगल्यात लपले असताना अवघ्या एका तासातच त्यांना कोणी फरार केले? या सर्वांना वाचविण्याचा किंवा त्यांना पाठीशी घालण्याचा कोण प्रयत्न करतेय? ही आर्थिक घोटाळ्याच्या तपासात नक्की कोणाचा होतोय राजकीय हस्तक्षेप, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लूटल्या गेलेल्या अन्यायग्रस्त ठेवीदारांना अद्याप मिळालेली नाहीत. ठेवीदारांना मोर्चे, आंदोलने प्रसंगी नाशिक पोलिस आयुक्त या सर्वांचे उंबरठे झिजविले आहेत.
‘व्हाईटकॉलर क्रिमिनल्स’ला संरक्षण देणाऱ्या भाजपचे राजकीय वाट्टोळे करणार अर्बन बँकेचे दोन लक्ष ठेवीदार ?
वैभवशाली अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासात पोलिसांवर प्रचंड राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप ज्येष्ठ वकिलांनी खासगीत बोलताना केला आहे. हे वकील या घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यासाठी ते एसपी ऑफिसमध्ये सातत्याने चकरा मारत पाठपुरावा करत असतात. रक्षाबंधनासाठी एकत्र आलेले आर्थिक घोटाळ्यातले मुख्य आरोपी आज ता.२२ रोजी पोलिसांच्या हाती लागणार, अशी त्यांनादेखील आशा होती. मात्र नक्की काय गडबड झाली, नक्की कुठून आणि कोणाचा फोन आला, हे त्यांच्यादेखील लक्षात आले नाही. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते या आरोपींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची संतापजनक शंका त्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे. मागे असाच राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे अहमदनगरला भाजपचा खासदार निवडून आला नाही, असा आरोप करत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत नगर अर्बन बँकेचे दोन लक्ष ठेवीदार भाजपचे नक्की राजकीय वाट्टोळे केल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा तळतळाट ‘या’ वकील बांधवाने दिलाय.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा