अहमदनगर | १८ ऑगस्ट | तुषार सोनवणे
छत्रपती शिवाजी महाराजा हे शूर योध्दे होतोच पण ते सर्वोच्च मानव होते. human rights ज्यांनी सकल मानवीहितासाठी कार्य केले. त्यांनी त्या-त्या काळातील प्रथापरंपरा पाळताना मानवीहिताला प्रथम प्राधान्य दिले. शत्रूच्याही स्त्रीयांचे संरक्षण आणि सन्मान केला, जो आजही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. याच वागणूकीतून महाराष्ट्र धर्माची ध्वजा जगभर उंचावली. शिवरायांचे खरे चरित्र वाचायचे असेल तर कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक डॉ. बाळकृष्ण यांचा ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांना ‘भारतीय आरमाराचे जनक’ हे नाव दिले. शिवरायांचे नाव घेताना आपल्याला त्यांच्या विचारांचे चांगले अनुयायी व्हावे लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केले.
हृदयरोग तज्ञ डॉ.धनंजय वारे, डॉ. महेश जरे, ‘अक्षरमानव माऊली सेवा’चे डॉ.राजेंद्र धामणे, मधिंदु ऑप्टिकल्स’चे डॉ.रविकांत पाचारणे, रहेमत सुलतान फाऊंडेशन, रयत समाचार परिवार यांनी आयोजित केलेल्या ‘कादंबरीपलीकडील छत्रपती शिवाजी महाराज’ या व्याख्यान प्रसंगी सावंत यांनी वरील उदगार काढले.
सुरूवातीलाच कोलकता येथील अत्याचारग्रस्त भगिनीला काही मिनिटे शांत उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. सर्व सभागृह काही मिनीटे अगदी स्तब्ध होते. व्याख्यानासाठी शहरपरिसरासह थेट कर्नाटक येथून तर काही पुणे जिल्ह्यातून शिवप्रेमी आले होते.
पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करण्यात आले. इंद्रजित सावंत यांचे सहकारी मनोज नरके, दिगंबर भोसले व यांचा सत्कार युनूस तांबटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
भरगच्च सभागृहात झालेल्या व्याख्यानाचे सुत्रसंचालन डॉ.रवि पाचारणे, प्रास्ताविक डॉ. धनंजय वारे यांनी तर पाहुण्यांचा परिचय भैरवनाथ वाकळे यांनी करून दिला. डॉ. वारे यांनी कार्यक्रमामागील भुमिका विषद केली. शिवाजी महाराज कादंबरीतून निट समजत नाहीत. त्यांच्या चरित्रामधे कमतरता रहाते. त्यामुळे थेट शिवचरित्राचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तराचा मुक्तसंवाद असा कार्यक्रम आयोजित केला होता. उपस्थित शिवप्रेमींनी अनेक विषयावर प्रश्न विचारले त्यात सरकारी तोतया वाघनखांचा प्रचारी वापर, शिवरायांचे खरे गुरू, भवानी तलवार, अनाजी पंताने केलेली फसवणूक, शिवरायांचे आरमार आदी विविध प्रश्नांवर सावंत यांनी संदर्भासह उत्तरे दिली.
व्याख्यानासाठी शिवप्रेमींसह अनेक जाणती मंडळी उपस्थित होती. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रामचंद्र दरे, भारतीय महिला फेडरेशनच्या स्मिता पानसरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.बन्सी सातपुते, माऊली सभागृहाचे दिनकर घोडके, आनंद शितोळे, लोकमतचे सुधीर लंके, मराठा सेवा संघाचे इंजी. सुरेश इथापे, संजय झिंजे, डॉ.राजीव सूर्यवंशी, संतोष काळे, सूरज शिंदे, फिरोज शेख, सतीश सातपुते, आम आदमी पार्टीच्या विद्या जाधव-शिंदे, राजेंद्र कर्डिले, डॉ. धनक, संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यान यशस्वीतेसाठी डॉ.अविनाश वारे, रमेशमामा गुंजाळ, अरविंद जगताप, संध्या मेढे, डॉ.प्रा.महेबुब सय्यद, युनूस तांबटकर, यशवंत तोडमल, अभिजीत दरेकर, असिफखान दुलेखान, इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, दिगंबर भोसले, पंकज गुंदेचा, सय्यद समी आदींनी परिश्रम घेतले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा