अहमदनगर | १२ ऑगस्ट | प्रतिनिधी
येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी court बी.बी.शेळके यांच्या न्यायालयात रोहन कांबळे यांस भा.द.वि.क.३५४ नूसार एक वर्ष सश्रम करावास व ५००/- रू. दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास व भा.द.वि.क.४५२ नूसार एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ५००/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
थोडक्यात हकीकत अशी, ता.२७.१२.२०२० रोजी पीडिता एकटीच घरी असताना आरोपी तिच्या बाथरूममध्ये घुसून पीडितेचा विनयभंग केला म्हणून पिडीत व्यक्तीने नगर तालुका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक ए.एच.आबनावे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोप दाखल केले. या प्रकरणात अभियोग पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले व आरोपीतर्फे एक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांच्या साक्षीप्रमाणे आरोपीने गून्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यास शिक्षा ठोठावण्यात आल्या.
अभियोग पक्षातर्फे वि. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड.आशा बाबर-वाघ यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून म.पो.हे.कॉ.प्रतीक्षा नरवडे- पातारे यांनी सहकार्य केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.