election:अनिलभैय्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी, त्यांचा वारसा पुढे न्या – शरद्चंद्र पवार; नगर शहर मतदारसंघात राठोडांवर लावणार डाव ?

77 / 100 SEO Score

अहमदनगर | तुषार सोनवणे

नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांनी भरीव काम केले आहे. त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे न्या, मी आहेच तुमच्याबरोबर, असे आश्वासन शरद्चंद्र पवार यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली तसेच नगर विधानसभेच्या election जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे, असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी अहमदनगरमधील शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

पुणे येथे मोदीबागेत खासदार पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी अहमदनगरहून गेलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. शहरातील सद्यस्थिती, राजकीय हालचालींबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे, शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगरहून युवा सेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, मंदार मुळे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.PSX 20240804 204540

नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आमदार अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव कार्य केलेले आहे. शिवसेनेची या मतदारसंघावर पकड आहे. राठोड परिवाराला नगरकरांनी कायम साथ दिली आहे. दिवंगत आमदार राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल. आपण सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. तुम्ही तयारीला लागा. शिवसेनेने पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.PSX 20240804 211235

शरद पवार यांच्या भेटीनंतर अहमदनगरची जागा निश्चितच शिवसेनेला सुटेल, असा आशावाद व्यक्त करत मागील निवडणुकीत आमदार अनिल भैय्यांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.

FB IMG 1722823851989
शरद पवार यांनी अहमदनगर शहर दक्षिण मतदार संघासह महाराष्ट्राला दिलेला संदेश पहा, वाचा, समजून घ्या.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविण्याची विनंती.

हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *