श्रीगोंदा | गौरव लष्करे
येथील एसटी डेपोच्या इंधन पंपावरील डिझेल संपल्यामुळे आज प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामध्ये वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, women महिलाभगिनी, शालेय विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली. अधिक माहिती घेतली असता, श्रीगोंदा एसटी डेपोतील अधिकाऱ्यांकडून डिझेल बुक करण्यात आले होते, मात्र डिझेलटँकर वेळेवर पोहचू शकला नाही. त्यामुळे डिझेलचा खडखडाट झाला आणि एसट्यांची चाके थांबली.
काल सकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी व एसटी चालक अक्षरशः बसून होते. अनेक वेगवेगळ्या मार्गांवरील गाड्या वेळेवर डेपोबाहेर पडू शकल्या नाहीत. महिलांसाठी हाप तिकीट सेवा असूनही महिलावर्ग एसटी महामंडळावर नाराज असल्याचे अनेक महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बऱ्याच गाड्या तुटलेल्या, मोडलेल्या अवस्थेत प्रवासी वाहतूक करताना रस्त्यात बंद पडतात, प्रवाशांचा आदळआपट होत असते.
आतातर डिझेल वेळेवर मिळत नाही ही एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाकडे कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न असताना महामंडळाचे याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न प्रवाशांकडून विशेषतः महिला वर्गाकडून विचारला जात आहे. लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन महामंडळाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा