जामखेड | रिजवान शेख, जवळा
ज्योती क्रांती को.ऑप. क्रेडिट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे यांना ऑरेंज बिजनेस एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
ऑरेंज रेडीओ यांच्या माध्यमातून दिला जाणारा ऑरेंज बिजनेस एक्सलन्स अवार्ड यावर्षी ज्योती क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष हजारे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकिंग, सामाजिक, शैक्षणिक, शेती, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यासह विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम करत असल्याने त्या कामाची दखल घेत देण्यात आला.
ज्योती क्रांतीचे संस्थापक हजारे यांनी ता.५ सप्टेंबर २००० साली या पतसंस्थेची स्थापना केली. एका शाखेवरून आज पतसंस्थेच्या ४८ शाखा ३०० कर्मचारी २०० दैनिक ठेव प्रतिनिधींसह ५ राज्यात कार्यक्षेत्र असून यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांत विस्तार आहे. मुख्य शाखा जवळा रजिस्टर कार्यालय तर अहमदनगर येथे कॅर्पोरेट कार्यालय आहे.
ज्योती क्रांतीच्या माध्यमातून आजिनाथ हजारे यांनी ३० ग्राहक सेवा केंद्र, ५ हजार महिला बचतगट, ५० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे ज्योती क्रांतीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील व्यवसायिकांना उभे करण्यासाठी योगदान आहे.
ज्योती क्रांती च्या वाटचालीस माझे सहकारी यांची देखील मोलाची साथ मिळाली यामध्ये मारुती रोडे, भानुदास हजारे, भानुदास रोडे, दशरथ हजारे, विष्णू हजारे, सुभाष सरोदे, राजेंद्र मोहळकर, मारुती नाळे, अनिल आव्हाड, राजेंद्र हजारे, दत्ता कोल्हे, बळीराम अवसरे, सुरेश कुंभार, कुंडलिक कोल्हे, कै. कथले, नागनाथ गुरुजी, किसन मेहेर, अभय नाळे तसेच सर्व संचालक, सभासद, खातेदार, कर्मचारी यांचे योगदान लाभले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी किरण वर्पे यांचे सहकार्य लाभले.
संचालक, सभासद, खातेदार, कर्मचारी यांचा हा सन्मान ग्रामीण भागात असलेल्या ज्योती क्रांतीच्या शाखेचे रोपटे जवळा गावात लावून आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. यामध्ये संचालक, सभासद, खातेदार, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. हा सन्मान माझा नसून संचालक, सभासद, खातेदार, कर्मचारी यांचा असल्याचे ज्योती क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ हजारे यांनी रयत समाचारसोबत बोलताना सांगितले.