AIPolice: कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी 'मार्वल’ कंपनीची स्थापना; महाराष्ट्र पोलीस दलाला मिळणार जोड - Rayat Samachar

AIPolice: कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ‘मार्वल’ कंपनीची स्थापना; महाराष्ट्र पोलीस दलाला मिळणार जोड

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
19 / 100

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात नुकतीच ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा AI वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला याची जोड मिळणार आहे. याबाबतचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पोलीस जिमखाना येथे करण्यात आले.

मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा AI वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी Police दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

हे ही वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment