अहमदनगर | विजय मते
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाअुलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा कॉलेजचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम वर्षाचा ९४ टक्के तर द्वितीय वर्षाचा ९६ टक्के निकाल लागला.
प्रथम वर्ष निकालामध्ये अनुक्रमे प्रथम- शेख झोया रियाज (७९.९९%), द्वितीय- शेख मेहेक मन्सूर (७६.४०%), तृतीय – महामुनी संस्कृती विनायक (७५.४०%) तर द्वितीय वर्षांमध्ये : प्रथम – शेख रीमशा रियाज (८३.४६%) द्वितीय – सय्यद राहत इरफान (८३.२७%) तृतीय – बटुळे कोमल अंबादास (८२.१८%) यांनी यश मिळविले.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाअुलबुधे, सहसचिव रामकिसन देशमुख, विश्वस्त साई पाअुलबुधे, डॉ.श्रद्धा पाअुलबुधे, बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.शाम पंगा, डी.फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



