श्रीगोंदा | प्रतिनिधी |२९
स्व.सुभाषराव मोरे आणि वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून पर्यावरण मंडळाची स्थापना केली. दिल्लीपर्यंत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेद्वारे वाढत्या विस्तारातून प्रमोद मोरे वृक्षारोपण, पशुसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण समतोलाचे उत्तम कार्य करीत आहे. त्यांनी स्व.सुभाषराव मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देखील विविध आजार बरे होण्यासाठी वनौषधी झाडांचे वाटप केले. अशा मोरे कुटुंबीयांचं आदर्श समाजाने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काष्टी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवानआबा पाचपुते यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील श्री क्षेत्र सुरेगाव येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रमोद मोरे यांचे वडील स्व. सुभाष मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात होता. यावेळी पर्यावरण मंडळाचे वतीने गुडमार (बेडकी) या वनऔषधी वृक्षांचे वृक्षारोपण व वाटप भगवान पाचपुते, ह.भ.प. बाळकृष्ण दळवी महाराज, अध्यक्ष प्रमोद मोरे, वनश्री प्रवीण गुणवरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर, कार्याध्यक्ष छायाताई राजपूत, प्रा.संजय लाकूडझोडे, सुभाष वाखारे, सुभाष धुमाळ, संचालक अंकुश रोडे, संभाजी घुटे, डॉ. अनिल मोरे, अशोक वाळके, सरपंच प्रसाद रामफळे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भगवान पाचपुते यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, प्रमोद मोरे हे आपल्या चुलत्यांचा आणि वडिलांचा पर्यावरण संवर्धनाचा वारसा जपत असून महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते त्यांच्या समवेत वसुंधरेला हिरवा शालू परिधान करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या पर्यावरण चळवळीला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहील.
वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रमोद मोरे यांनी संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर येथील बालसंस्कार व जनजागृती मानव कल्याण सेवाभावी संस्थेतील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. यावेळी मारुती कदम, अमोल चंदनशिवे, डॉ. शरद दुधाट, कोंडीराम नेहे, विजय बोडके, चंद्रकांत भोजने, उत्तम पवार, सरपंच बाळासाहेब ढोले, बाळासाहेब गाडेकर, राजाराम ढवळे, मोहन खवळे, आशाताई कांबळे, मुख्याध्यापक रवींद्र पवार, मुख्याध्यापक शिवाजी उदार, मच्छिंद्र लहाकर, गुलाब रामफळे, गणेश रोडे, किरण टकले, किरण रोडे यांच्यासह मंडळातील सदस्य उपस्थित होते. सर्वांनी स्व.सुभाषराव मोरे यांना भावपूर्ण आदरांजली केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर तर आभार डॉ. अनिल मोरे यांनी मानले.