थकीत कर्ज व्याज देणे या बेकायदेशीर तरतूदीमुळे सहकार कायदा १९६० कलम ८३ नूसार श्री मार्कंडेय ना.सह. पतसंस्थेची चौकशी करावी - पुरुषोत्तम सब्बन - Rayat Samachar

थकीत कर्ज व्याज देणे या बेकायदेशीर तरतूदीमुळे सहकार कायदा १९६० कलम ८३ नूसार श्री मार्कंडेय ना.सह. पतसंस्थेची चौकशी करावी – पुरुषोत्तम सब्बन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) २१.६.२०२४

येथील दिल्लीगेट भागातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेने कायद्यामधे कोणतीही तरतूद नसतांना बेकायदेशीरपणे संस्थेच्या नफ्याच्या रक्कमेचा अपहार करण्याच्या गैरउद्देशाने नफ्याची तरतुदीची रक्कम रुपये रू.४,६१,९६,३५५/- थकीत कर्ज व्याज देणे म्हणुन तरतूद केलेली आहे. याची चौकशी व्हावी म्हणुन संस्थेचे जागृत सदस्य पुरुषोत्तम सब्बन यांनी तालुका उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था ही अहमदनगर शहरांतील गोरगरीब, मोलमजुरी करणारे विडी कामगार यांनी स्थापन केलेली संस्था असताना याचे काही पदाधिकारी संचालक यांनी बँकेला ब्लॅकमेलिंग करून संस्थेचे पदाधिकारी व संचालक झालेले आहेत. यामुळे संस्था अधोगतीला जात आहे. या संस्थेचे काही संचालक अशिक्षित असल्यामुळे व आर्थिक गैव्यवहार करण्याच्या गैरउद्देशाने कारभार चालत असल्यामुळे गोरगरिबांची रक्कमेचा अपहार होवू नये. या उद्दशाने पुरुषोत्तम सब्बन यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ८३ प्रमाणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

पतसंस्थेने सन २०२२-२३ वर्षात संस्थेचे थकीत कर्ज व्याज देण्याची तरतूद म्हणुन ४ कोटीपेक्षा जास्त रक्कम तरतूद केली आहे. या पूर्वीच्या वार्षिक अहवालात कोठेही अशा प्रकारचा व्याज देण्याची तरतूद केलेली नाही. याचाच अर्थ कर्जदार यांनी मागील ३ ते ४ वर्षात थकीत कर्जाची रक्कम मोठी असल्यामुळे संस्थेचा एन पी ए वाढलेल्या असल्या कारणामुळे संस्थेस आज पावेतो मिळालेल्या संपूर्ण नफ्याची तरतूद ही थकीत कर्जव्याज देणे म्हणुन करावी लागत असल्याचे निदर्शनास येते. याचाच अर्थ संस्थेची कर्जथकबाकी मोठ्या प्रमाणात झालेली असून संस्थेचे संचालक हे कर्जवसुली व थकबाकीदारांकडून वसुली करण्यास असमर्थ ठरलेले असून अशीच परिस्थिती राहिल्यास संस्था लवकरच अवसायनात निघण्याची शक्यता आहे. म्हणून संस्थेची व संचालकांची चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी संस्थेचे जागृत सदस्य पुरुषोत्तम सब्बन यांनी केली.

Share This Article
1 Comment