सोलापुर (प्रतिनिधी) १९.६.२०२४
योगपट्ट नाथसिद्ध संप्रदायात प्रामुख्याने वापरतात. हल्लीच्या काळात असे सिद्ध योगी राहिले नाहीत. नुकताच सोलापूर येथील समाधान आश्रमातील जडेशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचा योग साधनेतील फोटो घेतला. ही प्राचीन योगविद्या शांत संप्रदायात प्रसिद्ध होती. १३ व्या शतकात अनेक शैव संप्रदाय वीरशैव लिंगायतमध्ये समरस झाले. हंपी येथील योग नृसिंह किंवा तामिळनाडू येथील मत्सयेंद्रनाथ मीननाथ तसेच योगपट्ट धारण केलेली पार्वती. अश्या अनेक १५०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन मूर्ती सापडतात. अशी माहिती विशाल फुटाणे यांनी दिली.