पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) १९.६.२०२४

येथील लोकसभा मतदारसंघातील आरएसएस भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. सुजय विखे यांच्यासह देशातील १० ते १२ उमेदवारांनी अशीच मागणी केली आहे. विखे यांचा लंके यांनी सुमारे २९ हजार मतांनी पराभव केला आहे.
कमी फरकाने पराभव झालेल्या अनेक उमेदवारांनी असे अर्ज केले आहेत. त्यासाठी निर्धारित केलेले शुल्कही भरण्यात आले असून या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून यासंबधी निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येते. Economic Times ने हे वृत्त दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *