पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपण

अहमदनगर (प्रतिनिधी) १५.६.२०२४

महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त लालटाकी रोड, वेदांत टॉवर समोर कडुनिंब, चिंच, करंजी आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांच्या संवर्धनाचे पालकत्व कार्यकर्ते रामभाऊ वडागळे व विजय महाराज वडागळे यांना देण्यात आले.
यावेळी सामाजिक समता विचारधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील भोसले, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनील सकट अशोक भोसले, रोहिदास जगधने, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी भोसले म्हणाले वृक्षारोपणासाठी जागा उद्योजक अनिल जोशी यांनी उपलब्ध करून दिली. ना विखे यांच्या वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. वृक्षारोपण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. झाडांमुळे कोणत्याही घराचे, बंगल्याचे सौंदर्य खुलते. एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वृक्षारोपण केले आहे. आपल्याकडे अलीकडील काळात वृक्षारोपणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे; पण त्याचे प्रमाण अपेक्षेएवढे नाही. म्हणूनच झाडे लावली आहेत.
सुनील सकट यांनी नामदार विखे पाटील यांना निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो,अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून ते म्हणाले वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणे कठीण झाले. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आम्ही वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे ठरवले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *