Book Donation To Library: वाचन संस्कृतीला बळ; माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे यांच्याकडून वाचनालयास 100 पुस्तकांची भेट

Book Donation to Library: वाचन संस्कृतीला बळ; माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे यांच्याकडून वाचनालयास १०० पुस्तकांची भेट

rayatsamachar
2 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | १३.११ | पंकज गुंदेचा

Book Donation to Library: ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांसह युवकांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे आणि वाचनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या सामाजिक भावनेतून माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे यांनी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठान संचलित ‘सद्गुरु श्री साहेबराव आवारे वाचनालयास’ १०० पुस्तके भेट दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने घोरपडे यांनी पुस्तकांचा हा अनमोल ठेवा वाचनालयाकडे सुपूर्द केला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर यांनी माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे यांचे आभार मानले. ते म्हणाले की, पुस्तकांची भेट ही केवळ वस्तूची देणगी नसून ती ज्ञानदानाची आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याची गुंतवणूक आहे. घोरपडे यांनी केलेल्या या पुस्तकदानातून समाजातील इतर दानशूर व्यक्ती, माजी सैनिक, शिक्षक आणि वाचनप्रेमींनाही प्रेरणा मिळावी. त्यांनीही आपल्या परीने वाचनालयाला पुस्तके भेट देऊन ज्ञानाची ही चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
समाजातील प्रत्येकाने वाढदिवस, स्मृतिदिन किंवा अन्य आनंदाच्या प्रसंगी भेटवस्तूंऐवजी पुस्तकांची भेट देण्याची परंपरा सुरू केल्यास ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजण्यास आणि ती अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे यांच्या या पुस्तकदान उपक्रमामुळे ग्रामीण भागातील वाचक, विद्यार्थी आणि युवकांना ज्ञानसंपादनाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading