33rd Kavi Sammelan: पत्रांत जपलेली नाती आणि माडगूळकरांच्या साहित्याचा भावस्पर्श : ३३वे कविसंमेलन संपन्न - Rayat Samachar

33rd Kavi Sammelan: पत्रांत जपलेली नाती आणि माडगूळकरांच्या साहित्याचा भावस्पर्श : ३३वे कविसंमेलन संपन्न

rayatsamachar
3 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

33rd Kavi Sammelan: पत्रांच्या शब्दांत जपलेली नाती, आठवणी आणि सामाजिक जाणिवांना कवितेतून अभिव्यक्ती देणारे ३३वे कविसंमेलन रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई येथे संपन्न झाले. या कविसंमेलनाचे आयोजन मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने करण्यात आले.

संस्थेच्या अकराव्या वर्षात झालेल्या या उपक्रमात कवींना स्वरचित कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमात मुक्त विषय, राष्ट्रीय टपाल दिनाच्या पूर्वस्मरणार्थ कविता आणि आदरणीय ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे अभिवाचन अशी तीन नियोजित सत्रे झाली.
पहिल्या सत्रात मुक्त विषयांवरील स्वरचित कवितांचे सादरीकरण झाले. जीवनानुभव, निसर्ग, मानवी नाती, सामाजिक वास्तव आणि अंतर्मनातील भावविश्व अशा विविध विषयांवरील कविता कवींनी सादर केल्या.
दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय टपाल दिनाच्या पूर्वस्मरणार्थ पत्र, टपाल, पत्रलेखन, नाती, आठवणी, विरह, प्रतीक्षा आणि संवाद या विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. बदलत्या संवादमाध्यमांच्या काळात पत्रांशी जोडलेल्या आठवणी, आपुलकी आणि माणसांमधील भावबंध या कवितांमधून व्यक्त झाले.
तिसऱ्या सत्रात आदरणीय ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे अभिवाचन करण्यात आले. सहभागींच्या अभिवाचनातून त्यांच्या साहित्याला अभिवादन करण्यात आले. या सत्रातून काव्यसादरीकरणासोबत मराठी साहित्यपरंपरेतील एका महत्त्वपूर्ण साहित्यिकाच्या लेखनाचा परिचय रसिकांना झाला.
उपलब्ध वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी सर्वांच्या संमतीने चौथ्या सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात सहभागी कवींनी आपल्या आवडीच्या स्वरचित कविता सादर केल्या. या अतिरिक्त सत्रामुळे सहभागी कवींना आणखी एका रचनेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
अशोक कुलकर्णी, अशोक सहदेव सुकाळे, कृपा राकेश म्हात्रे, चंद्रकांत दढेकर, ज्योती राखुंडे, डॉ. मानसी पाटील, प्रणित थळे, प्रतिभा नवघरे, प्रिया प्रमोद दामले, बजरंग लक्ष्मण परब, बालकवयित्री अजया, विवेक वसंत जोशी, समिधा विकास नलावडे, सुनिता पांडुरंग अनभुले आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
कवितांच्या आस्वादासाठी अजिता अजित मुळीक आणि अभिषेक अनभुले उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था कृपा राकेश म्हात्रे यांनी केली.
समारोपप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी सहभागी कवी, आस्वादकांचे आभार मानले. कविता ही भावभावना, अनुभव, विचार आणि सामाजिक जाणिवांना अभिव्यक्त करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रांशी जोडलेल्या आठवणींपासून ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनापर्यंत विविध साहित्यिक विषयांना या कविसंमेलनात स्थान मिळाले.
मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने पुढील ३४वे कविसंमेलन रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading